पुणे

चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयात वृक्ष रक्षाबंधन उत्साहात साजरे, विद्यार्थीनींनी आपल्या इच्छित क्षेत्रात प्रगती करावी – अश्विनी राख, सहाय्यक पोलिस आयुक्त

हडपसर चं.बा. तुपे साधना कन्या विद्यालयामध्ये रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून वृक्ष रक्षाबंधन हा स्तुत्य उपक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, प्रमुख पाहुणे अश्विनी राख (सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर),  दिनेश शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्षारक्षाबंधना बरोबरच रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना माननीय सौ. अश्विनी राख यांनी प्रेरणादायी मार्गदर्शनात अपयशातून खचून न जाता वडीलधाऱ्यांचा सल्ला घेण्याचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी दिनेश शिंदे यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी माननीय प्राचार्या सौ. सुजाता कालेकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य विठ्ठल तुळजापुरे, पर्यवेक्षक नितीन सोनवणे,  छाया पवार,  मंदाकिनी शिंदे उपस्थित होत्या. कविता टिळेकर यांनी सूत्रसंचालन केले. लालासाहेब खलाटे यांनी आभार मानले.