पुणे

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी मेरा देश अंतर्गत’ पुणे जिल्हा स्तरीय (ग्रामीण) सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धांचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य सल्लागार राजेश पांडे यांच्या हस्ते झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. धोंडीराम पवार, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडवणीस, अधिसभा सदस्य राहुल पाखरे, रा.से.यो. संचालक डॉ. सदानंद भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते.
व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्तांनी बलिदान दिले. देश व राष्ट्रीयत्वाची भावना युवकांमध्ये रुजवण्याची गरज असल्याचे सांगितले.

भारत देशाला बलिदान त्यागाचा इतिहास आहे या इतिहासाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. या देशाच्या मातीने देशाला अनेक सुपुत्र दिले आहेत. त्या मातीला नमन करूयात. दिल्लीत निर्माण होणाऱ्या अमृतवाटिकेत आपल्या गावची माती मिसळून देशाबद्दल प्रतिबद्ध होऊयात असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य सल्लागार राजेश पांडे यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य ॲड. संदीप कदम यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. आज या संस्थेची गुणात्मक घोडदौड सुरू असून कला-क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी नैपुण्य मिळवत असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी मातीशी नातं पुनर्जीवित करणारा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. आपल्याला समृद्ध संस्कृती लाभली असून लोककला, लोकवाद्य, लोकसंगीत हे आपल्या संस्कृतीची संचितं आहेत त्यांना आपण जपलं पाहिजे असे सांगितले.
स्पर्धेचा निकाल
निबंध स्पर्धा : इंग्रजी माध्यम- प्रथम क्रमांक: संध्या टोनपे (एम. आय. टी. कॉलेज आळंदी) मराठी माध्यम – प्रथम क्रमांक: प्रणाली गाढवे (एसपीएमएम कॉलेज तळेगाव दाभाडे)
वक्तृत्व स्पर्धा – प्रथम क्रमांक: तृप्ती जाधव (टी. सी. कॉलेज बारामती)
लोकगीत गायन स्पर्धा – प्रथम क्रमांक: धनश्री शिंदे ( सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय)
लोकवाद्य वादन स्पर्धा – प्रथम क्रमांक: शिवराम सरटे (विद्याप्रतिष्ठान कॉलेज बारामती)
भित्तीपत्रक स्पर्धा – प्रथम क्रमांक: राजस पाटील (विद्याप्रतिष्ठान कॉलेज बारामती)
पथनाट्य स्पर्धा- प्रथम क्रमांक: सपना कुदळे (विद्याप्रतिष्ठान कॉलेज बारामती)
या स्पर्धेत एकूण २८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. डॉ. प्रभाकर वराडे, डॉ. विलास कर्डिले, डॉ. मेघा धर्माधिकारी, ओंकार डांगमाळी, डॉ. नाना शेजवळ, डॉ. अमित गोगावले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

 

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश गांधिले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजेश रसाळ, डॉ. नाना झगडे, प्रा. नितीन लगड, प्रा. गौरव शेलार, प्रा. अंजु मुंडे कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.