पुणेमहाराष्ट्र

धक्कादायक! पार्ट टाईम जॉबच्या नादात पोलिस हवालदारालाच बसला 5 लाख रुपयांना फटका …!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस कॉलनीत राहणाऱ्या एका पोलिस हवालदास सायबर क्राइमचा चांगलाच फटका बसला आहे.सदरील घटनेत पोलीस हवालदाराने 5 लाख रुपये गमावले असल्याची प्राथमिक माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. पुणे तिथे काय उणे, विद्येचे माहेर घर, आय टी शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात सध्या फार मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. दरम्यान पुणे शहरात एक पोलिस हवालदार सायबर क्राइमचा बळी पडल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील शिवाजी नगर पोलिस कॉलनीत वास्तव्यास असणाऱ्या पोलिसाची सायबर क्राईम कडून 5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या घटनेनंतर परिसरात तसेच पोलिसांत मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सुरुवातीला सायबर बळी झालेल्या पोलिस हवालदाराला त्याच्या मोबाईलवर सायबर गुन्हेगारांकडून मेसेज आला. सोशल मीडियावरील जाहिराती आणि पसंती मिळवणाऱ्या कॅन्टेट संबंधित ऑनलाइन टास्कद्वारे आकर्षक परतावा (पैसे) देण्याचे आश्वासन देऊन त्याला भुरळ घातली. त्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन कॅन्टेंटचा वापर केला आणि फसवणूकीसाठी सारखा संवाद साधला.

पार्ट टाईम काम करून लाखो रुपये कमवा असा एका टास्क सुरुवातीला दिला. सायबर गुन्हेगारांनी पीडित पोलिसाला सतत आमिष दाखवून जाळ्यात अडकवले. सुरुवातीला काम दिले आणि पूर्ण केलेल्या कामांसाठी पैसेही दिले जायचे.मात्र काही दिवसांनी सदरील कामात दुप्पट पैसे मिळवायचे असतील तर आमच्याकडे 4,99,000 डिपॉजिट करावे लागतील असे सांगण्यात आले. सुरुवातीला पोलीस हवालदाराने नकार दिला. परंतु दुप्पट रक्कम मिळण्याच्या अमिषाला हवालदार बळी पडला.

आणि पैशाच्या हव्यासापोटी पोलिस हवालदाराने संपुर्ण रक्कम एका वेबसाईटद्वारे सायबर चोरट्याकडे भरून दिली. पैसे जमा केल्यानंतर सायबर चोरट्यांनी लगेचच त्यांचे मोबाईल नंबर ब्लॉक केले. नंबर बंद झाल्यामुळे त्यांच्याशी कसलाही संपर्क होईना त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पोलिसाच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसाने लगेच या घटनेची तक्रार शिवाजीनगर पोलिसांत दिली.सदरील प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर सायबर क्राईम पोलीस करत आहेत.