पुणे

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी खेड तालुक्यातील निर्मला पानसरे तर, उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजीत शिवतरे यांची निवड झाली आहे.

या निवडीने खेड तालुक्याला पहिल्यांदाच अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. पानसरे या खेड तालुक्यातील रेटवडी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या आहेत. याआधी त्यांनी बहुळी गावच्या सरपंचपदी काम केले आहे.

शिवतरे हे भोर तालुक्यातील उत्रोली-कारी गटातून निवडून आले आहेत. शिवतरे यांनी याआधी २००७-०९ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी काम केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता विशेष सर्वसाधारण सभा झाली. या सभेत या दोघांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

Good information. Lucky me I discovered your site by
chance (stumbleupon). I’ve book-marked it for later!

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x