पुणे

शिवाजी महाराज व तानाजीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी तानाजी चित्रपटाला डोक्यावर घेतलं.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या ट्रेलर्स, टीझरवरूनचे कल्पना आली होती की तो बॉक्स ऑफिसवर धडक मारणार.. झालंही तसंच! काल (ता. 10) तानाजी रिलीज झाला. या चित्रपटाचं देशभरात जंगी स्वागत करण्यात आलं. कुठे अजयच्या तानाजीच्या रूपातल्या पुतळ्याला हार घालण्यात आले तर कुठे फटाके फोडून तानाजीला सुरवात कण्यात आली. शिवाजी महाराज व तानाजीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी तानाजी चित्रपटाला डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल…

नवा चित्रपट : तान्हाजी द अनसंग वॉरिअर

चित्रपट जाणकारांच्या मते तानाजी पहिल्याच दिवशी 10 करोडची कमाई करेल. पण हे सगळे अंदाज धुडकावत तानाजीने पहिल्याच दिवशी 15 कोटींचा गल्ला जमावला आहे. पहिल्याच दिवश तानाजी लागलेले सर्व थिएटर हाऊसफुल्ल पाटीने झळकत होते. पहिल्याच दिवशी 15 कोटींची मजल मारलेल्या तानाजीची कमाई मोठ्या प्रमाणात होणार यात काही शंका नाही. ट्रेड अॅनालिस्ट राज बंन्सल यांनी ट्विट करत तानाजीच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा सांगितला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x