पुणेमहाराष्ट्र

हवेली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

प्रतिनिधि-स्वप्नील कदम

महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे.बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतातील पाहिले नियतकालिक सुरु केले असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आज दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा. हवेली तालुका पत्रकार संघाच्या लोणी काळभोर च्या ऑफिस मध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.हवेली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

त्यावेळी बाळशास्त्री जांभेकर प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला आभिवादन करण्यात आले. त्यावेळी हवेली तालुका अध्यक्ष- रमेश निकाळजे, उपाध्यक्ष- स्वप्निल कदम, सचिव- सुनील शिरसाठ, संघटक -फकीर इनामदार, बाबा इनामदार, सनी फलटणकर, फिरोज शेख, सचिन काळभोर यांनी प्रतिमेचे पूजन व आभिवादन करून व पत्रकार दिन साजरा करण्यात आला.