पुणेमहाराष्ट्र

मोबाईलने घात केला… पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव उघड

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः
पुणे, दि. २७ : पतीने पत्नीला तू घरी असे सांगितले आणि तिथेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करून एकाने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना गोखलेनगर परिसरात घडली. पत्नीचा खून करून पसार झालेल्या तरुणाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा चंदर पंतेकर (वय ३०, रा. जनता वसाहत, जनवाडी, गोखलेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदर अशोक पंतेकर (वय ३३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, राहुल राजू मंजाळकर (वय २४, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेश्मा आणि चंदर यांचा बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना बारा वर्षांचा मुलगा आहे. काही महिन्यांपासून चंदर पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यामुळे रेश्मा माहेरी गेल्या होत्या. १९ जानेवारी रोजी चंदरने रेश्माशी संपर्क साधला. माझी चूक झाली आहे. तू घरी ये, असे त्याने सांगितले. त्यानंतर रेश्मा घरी आल्या.