पुणे

‘चुनाव ही प्राण हो तो सोचिए कौन सी प्रतिष्ठा दाँव पर लगी होगी….’ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाषणाची देशभरात चर्चा

पुणे – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेले कविता वाचन आणि भाषणाने गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील सोशल मीडिया व्यापला आहे. त्यांचे युट्यूबवरील भाषण २ लाख ५६ हजार जणांनी पाहिले तर न्यूज चॅनलला ७ लाख ५४ हजार जणांनी पाहिले. विशेष म्हणजे त्यापैकी १ लाख २५ हजार जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रापासून ते सर्वसामान्य नागरिकांसह या भाषणाची देशभरात चर्चा होते आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक संसदपटूच्या भाषणाची आठवण झाल्याचे आवर्जून नमूद केले आहे. या भाषणाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रतिसाद मिळाला आहे.

झी न्यूजचे माजी पत्रकार मोहम्मद अनास यांनी ‘बहुत दिनों के बाद लोकसभा में किसी सच्चे जन नेता का भाषण सुनने को मिला’ अशी प्रतिक्रिया दिली तर पत्रकार दिनेश डांगी यांनी एक-एक शब्द और बात तर्कपूर्ण और शालीनता के साथ जो सच्चाई बयां की वो दिल को छु रही है असं म्हटलं आहे. खासदार डॉ. कोल्हे यांच्या भाषणावर न्यूज २४ चे पत्रकार अशोक शेखावत, वरिष्ठ पत्रकार राजू परुळेकर, मुक्त पत्रकार व मध्यप्रदेशच्या खासदार सुप्रिया भारद्वाज, श्रीमंत माने, मिलिंद खांडेकर यांनी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

विशेष म्हणजे भाजप वगळता राजकीय नेत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्नाटक काँग्रेसचे जितेंद्र देव यांनी, ‘संसद के अंदर गूंजी इस आवाज को अंत तक सुनिये’ असे आवाहन केले आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव, आमदार भाई जगताप, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजू आवळे, आमदार रोहित पवार, आमदार यशोमती ठाकूर आदींनी संयमी आणि जबरदस्त भाषण असल्याची तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड या ‘जिंकलस भावा’ अशी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर भीम आर्मीचे अनिल कुमार, राजस्थान काँग्रेसचे माजी सचिव सुशील असोपा, उत्तर पूर्व भारतातील काँग्रेसचे समर्थक डॉ. एम. के. शर्मिला, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, युथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव राजेश सिन्हा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रतिक पाटील, रविकांत वरपे, शिवानी वडेट्टीवार आदींनी खासदार डॉ. कोल्हे यांच्या भाषणाचे भरभरून कौतुक केले आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या संसदेतील भाषणाची भुरळ केवळ राजकीय व्यक्तींनाच पडली असे नाही, तर सार्वजनिक धोरण निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या आदित्य गोस्वामी यांनी ‘क्या खूब बोला है सांसद अमोल कोल्हे ने’ तर अॅड. आनंद दासा यांनी भक्तांनो ऐकू नका. कुणीतरी कानात गरम तेल ओतल्याचा भास होईल, इतकी सत्यता भाषणात असल्याचे म्हटले आहे. संग्राम पाटील यांनी ‘खासदार डॉ. कोल्हे यांनी अस्सल शालीतून जोडे दिल्याचे मत व्यक्त करीत भाषण ऐकण्यासारखे आहे, असे म्हटले आहे. आदित्य या विशाखापट्टणमच्या उद्योजकालाही डॉ. कोल्हे यांच्या अस्खलित हिंदीमध्ये केलेल्या भाषणाचे कौतुक करण्याचा मोह आवरला नाही.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या भाषणावर दिग्दर्शक व अभिनेता हेमंत ढोमे यांनी ‘मुद्देसूद पद्धतीने, शालिनतेने आपलं मत मांडता येतं आणि मनं जिंकता येतात! वाह, वाह! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे, तर व्यंगचित्रकार सतीश आचार्य, दिल्लीच्या दीपक कुमार शर्मा, गजेंद्र बोटुंडा, राजकीय विश्लेषक अॅड. नरेश मीना यांनी भाषणाचे स्वागत केले. समाजवादी पार्टीचे अभय यादव यांनी ‘इससे खूबसुरत शायद ही कोई स्पीच होगी, एक बार जरुर सुने और शेयर करें असे आवाहन केले आहे.

अलिकडच्या काळात संसदेत प्रभावी भाषणं अभावानेच ऐकायला मिळतात. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कोल्हे यांच्या भाषणांनी संसदेच्या सभागृहावर उमटवलेली छाप अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, मधु दंडवते, सोमनाथ चटर्जी अशा संसदपटूंची आठवण करून देत असेल तर ‘शिरुर’च्या जनतेसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे असे म्हणता येईल.