पुणे

“बहुचर्चित” यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला” “तब्बल 320 उमेदवारी अर्ज दाखल – सर्वानुमते निवडणूक टाळण्यासाठी बैठकांचा सपाटा…

हडपसर (संपादक – अनिल मोरे )

बहुचर्चित यशवंत सहकारी साखर कारखान्याची बारा वर्षानंतर निवडणूक लागली असून या निवडणुकीत तब्बल 320 अर्ज दाखल झाले आहेत हवेली तालुका व पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून कंबर कसली आहे. तब्बल 320 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असताना दिग्गज नेते निवडणूक टाळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.यशवंत साखर कारखाना बंद पडल्यानंतर तब्बल बारा वर्षांनी प्रशासकाकडून निवडणूक कार्यक्रम लावला आहे. २१ जागासांठी सहा सर्वसाधारणसह अकरा विविध मतदारसंघातून ३२० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

कारखान्याची अडचणीची परिस्थिती, देयके व कर्ज लक्षात घेता कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी 50 कोटीहून अधिक रक्कम लागणार असल्याने कारखान्यावर निवडणूक का लादायची असा विचार करत ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून हवेली तालुक्यातील नेत्यांनी पुढाकार घेतला आहे, या संदर्भात एक बैठक थेऊर येथील एका हॉटेलमध्ये झाली या बैठकी प्रसंगी माजी संचालक पांडुरंग काळे, सुरेश घुले, महादेव कांचन, माधव काळभोर, राजीव घुले, संदीप भोंडवे, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, अप्पासाहेब काळभोर, नवनाथ काकडे, रोहिदास उंद्रे, अशोक मोरे, नंदकुमार वाल्हेकर, दिलीप काळभोर, कमलेश काळभोर यांच्यासह हवेली तालुक्यातील दिग्गज नेत्यांचा समावेश होता.
उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वांना विनंती करून सर्वानुमते बिनविरोध संचालक मंडळ निवडून आणले जाईल व कारखाना नव्याने उभारणी साठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी माधव काळभोर आणि सुरेश घुले या ज्येष्ठ नेत्यांनी दिले.
अनेक वर्षांनी निवडणूक होत असल्याने तसेच यशवंत सहकारी साखर कारखाना पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणेच प्रतिष्ठेचा असल्याने निवडणूक बिनविरोध होते की नेत्यांना अपयश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

सुरुवातीला उदासिनता दिसत असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनेक पुढाऱ्यांनी रस घेतला आहे. त्यामुळे मांजरी-फुरसुंगी गटातील दोन जागांसाठी तब्बल २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
कारखाना स्थापनेपासून कारखान्यावर मांजरी, फुरसुंगी, शेवाळेवाडी, हडपसरचा मोठा प्रभाव राहिला आहे. मोठ्या खंडानंतर होत असलेल्या सध्याच्या या निवडणूकीतही हा प्रभाव पाहायला मिळणार आहे.

 

मांजरी-फुरसुंगी गट क्रमांक चार मधून आलेले अर्ज…..
यशवंतचे माजी संचालक राजीव घुले, सुरेश घुले, माजी उपसरपंच सुधीर घुले, राहूल घुले, वसंत शेवाळे, प्रदीप घुले, माजी नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे, माजी जिल्हापरिषद सदस्य संजय गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य दिनकर हरपळे, राहुल चोरघडे, किरण हरपळे, सुरेश कामठे, शामराव खुटवड, सागर हरपळे, विजय गायकवाड, शंकर हरपळे, महादेव कामठे, अनिल टिळेकर, दामोदर गायकवाड यांचा समावेश आहे.