पुणे

कोंबिंग ऑपरेशन /ऑल आउट च्या दरम्यान 2 अग्निशस्त्र ( पिस्टल ) व 7 राऊंड सह एक इसम युनिट 3 च्या ताब्यात

पिस्टल घेऊन पुण्यात उभा असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास युनिट ३ च्या तपस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले त्याकडून मुद्देमाल जप्त केला असून त्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी आयुक्तालय हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन आयोजित करून गंभीर गुन्ह्यातील पाहिजे, फरारी, तडीपार, मोक्का मधील पाहिजे, फरार घातक हत्यार सह मिळून येणारे आरोपीना त्यांचेवर परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने युनिट 03 कडील अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगारांचा शोध घेत असताना सहायक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर व पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना त्यांच्या गोपनीय बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की पोलीस अभिलेखा वरील गुन्हेगार नामे संतोष विनायक नातू रा मुक्काम पोस्ट पिंपळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे हा काळ्या रंगाच्या बॅग मध्ये 2 पिस्टल घेऊन निलायम ब्रिज खाली सार्वजनिक रोडवर कोणाची तरी वाट पाहत उभा आहे.

अशी खात्रीशीर माहिती प्राप्त होताच प्राप्त बातमी चे अनुषंगाने स्टाफ रवाना करून सदर इसमचा शोध घेऊन मिळून येताच ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता संतोष विनायक नातू वय 47 वर्षे धंदा शेती राहणार मुक्काम पोस्ट पिंपळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले.
त्याची व बॅगची झडती घेतली असता त्याचाकडे ८१हजार 600 रू किंमतीचे 2 लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल व 7 जिवंत राउंड मिळून आल्याने त्याचे विरूध्द हत्यार जवळ बाळगण्याबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे २००/२०२३ आर्म ॲक्ट क ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)१३५, प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास युनिट 3 करत आहे

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार,सह पोलीस आयुक्त पुणे शहर संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे सुनील तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार पाटील पो. उपनिरीक्षक राहुल पवार, सहाय्यक पोलीस फौजदार संतोष क्षिरसागर, पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे, शरद वाकसे, संजिव कळंबे, किरण पवार सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रकाश कट्टे, प्रताप पडवाळ, साईनाथ पाटील, सतिश कत्राळे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे, यांचे पथकाने केली आहे.