पुणेमहाराष्ट्र

आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी राजे नाईक यांची 232 वी जयंती लोणी काळभोर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : लोणीकाळभोर आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची 232 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. उमाजी राजे यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचे प्रथम जनक मानले जातात.

उमाजी नाईक राजांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला. उमाजी राजे नाईक खोमणे यांनी ब्रिटिश सरकार विरोधात अनेक वर्ष न्याय हक्कासाठी लढले सखोल चौदा वर्ष इंग्रजी हुकूमती ला सळो की पळो करणारे भारतातील पहिले क्रांतिकारक म्हणून उमाजी राजे हे ठरले. सशस्त्र क्रांतीचे प्रथम जनक मानले जाणारे उमाजी राजे यांचा मृत्यू 3 फेब्रुवारी 1832 रोजी खडकमाळ आळी पुणे येथे झाला ब्रिटिश भारत चळवळ भारतीय स्वतंत्र लढा प्रभाव छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्याच्या समोर ठेवून उमाजी राजांनी काम केले. लोणी काळभोर मधील सर्व बहुजन समाजाने एकत्र येऊन त्यामध्ये रामोशी, बौद्ध, मातंग, वडार, गोसावी, मराठा, माळी समाज यांच्या वतीने राजे उमाजी नाईक जयंती आनंदात साजरी करण्यात आली. यावेळी लोणी काळभोर चे क्राईम चे पोलीस निरीक्षक काळे साहेब, मेमाणे साहेब, मराठी पत्रकार परिषदेचे हवेली तालुका अध्यक्ष- रमेश निकाळजे सचिव- सुनील जी शिरसाठ, पत्रकार गोरोबा पवार, सदाशिव कांबळे, सनी फलटणकर,आकाश म्हात्रे, खंडागळे सर, प्रसिद्ध व्याख्याते माजी चेअरमन संजय मामा भालेराव,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन जय जवान ग्राम विकास प्रतिष्ठान, व ओम साई ग्रुप, अभिजीत भांडवलकर संजय कुलूत, सुनील लांडगे, भरत कुलूत, गिरीश कुलूत, सचिन चव्हाण, अक्षय चव्हाण, राहुल भंडलकर, गणेश खोसे, विक्रम चव्हाण, अजय चव्हाण, उमेश भांडवलकर, विशाल भांडवलकर, देवांग लांडगे, माऊली लांडगे, मयूर साळुंखे, अमोल लांडगे, सुरज साळुंखे, सोजल मात्रे, आकाश लांडगे, तेजस माकर, सर्व मंडळाचे युवा कार्यकर्ते जेष्ठ मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.