पुणे

बीड मध्ये धक्कादायक घटना! प्रसिद्ध महंतांनी उचललं टोकाचं पाऊल

बीड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी… प्रसिद्ध महंतांनी स्वतःवरच जीवघेणा हल्ला केल्याने वारकरी संप्रदायात खळबळ!
आष्टी तालुक्यातील महिंदा गावातील श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे प्रमुख ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. त्यांनी आधी सेवक आणि भक्तांना बाहेर थांबायला सांगितलं आणि नंतर खोलीत जाऊन हे टोकाचं पाऊल उचललं.

घटनेनंतर सेवकांनी दरवाजा उघडून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, स्वतः महाराजांनी व्हिडिओ संदेश देत “मी ठिक आहे, काळजी करू नका” असा दिलासा भक्तांना दिला आहे.
मात्र, इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट… तपास सुरू!