250 Kmph SPEED! BMW चा चुराडा 2 जणांचा जागीच मृत्यू

Rokhthok Maharashtra 2 0

मुंबईजवळील बदलापूरमध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर झालेल्या भीषण BMW अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नेगी याचा वाढदिवस साजरा केल्यानंतर तो आपल्या मित्र-मैत्रिणीसह निर्माणाधीन मुंबई-बडोदा एक्स्प्रेसवेवर फिरण्यासाठी गेला होता. मात्र हा आनंदाचा क्षण काही मिनिटांतच दुःखद दुर्घटनेत बदलला.
पहाटेच्या सुमारास BMW कार तब्बल 250 किलोमीटर प्रतितासाहून अधिक वेगाने धावत असल्याचे सांगितले जात आहे. एरंजाड परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर आदळली आणि अनेक वेळा पलटी झाली.
या भीषण अपघातात योगेश नेगी आणि रेबेका जेकब या दोघांचा जागीच मृत्यू झाला. कारचा इतका चुराडा झाला की मृतदेहांचे अवयवही दूरवर विखुरले गेल्याची माहिती समोर आली आहे.
तर कारमधील अंगद नावाचा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातावेळी चालक दारूच्या नशेत होता का? कारचा वेग नेमका किती होता? याचा तपास पोलीस आणि फॉरेन्सिक पथक करत आहेत.
वेगाचा थरार दोन जणांच्या जीवावर बेतला असून या घटनेने पुन्हा एकदा बेफाम वेगाच्या धोक्याची जाणीव करून दिली आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.