आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला, शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी होते मुख्य आरोपी, यांच्या पत्नी अद्याप फरार

Rokhthok Maharashtra 12 0

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

पुणे : शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी हा निर्णय दिला.

आमदार भोसले यांनी किडनीच्या आजाराचे उपचार ससून रुग्णालयात उपलब्ध नाहीत ते केवळ रुबी हॉल व पूना हॉस्पिटलमध्ये होत असल्याने हे उपचार करून घ्यायचे होते. त्यासाठी भोसले यांनी तात्पुरता जामीन अर्ज विशेष न्यायालयासमोर सादर केला होता. त्याला सागर कोठारी व सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला.

आरोपी भोसले हे नियमानुसार सरकारी किंवा खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात, असा युक्तिवाद गुंतवणूकदारांचे वकील अॅड. विलास पठारे यांनी केला तो ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा जामीनदरम्यान, याप्रकरणात आमदार भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले या आरोपी असून त्या अजून फरारी आहेत. तसेच इतर १२ आरोपींना अद्याप अटक झाली नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.