कोंढवा पोलिसांनी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या, येवलेवाडी-खडीमशीन चौकाजवळ केली कारवाई

Rokhthok Maharashtra 14 0

 

हडपसरः (प्रतिनिधी )

पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तुळशीराम शहाजी उगडे (वय 25, रा. टिळेकरनगर, पुणे, मूळ रा. लांडवाडी, ता. कर्जत. जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीकडून दोन पिस्टल, चार जिवंत काडतुसे असा एकूण 55 हाजर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

येवलेवाडी खडी मशीन चौकाजवळील श्रीराम चौक ते इस्कॉन मंदिर संशयित आरोपी थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे काडतुसे असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आली. आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील करीत आहेत.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, हवालदार विशाल मेमाणे, सतीश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, जोतिबा पवार, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, ज्ञानेश्वर भोसले, अभिजीत रत्नपारखी यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.