राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर उपाध्यक्षपदी भारती रमेश तुपे यांची निवड

Rokhthok Maharashtra 17 0

महादेव नगर येथील सामाजिक कार्यकर्त्या भारती रमेश तुपे यांची पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी ही नियुक्ती केली.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते भारती तुपे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
यावेळी हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, संदीप बधे उद्योजक रमेश तुपे आदी उपस्थित होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला पक्षात काम करण्याची संधी दिली याबद्दल मनःपूर्वक आभार, आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला संघटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पक्ष तळागाळापर्यंत नेण्यासाठी काम करणार आहे.
भारती रमेश तुपे
उपाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस महिला पुणे शहर

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.