हिंदू मुस्लिम परस्पर एकोपा वाढावा आणि समाज निकोप व्हावा – राजाभाऊ होले

Rokhthok Maharashtra 20 0

तुकाई टेकडी येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन

फुरसुंगीः हिंदू मुस्लिम धर्मात भाईचारा वाढावा.दोघांनी परस्परांशी प्रेमाने,एकोप्याने,सहयोगाने रहावे व हा समाज निकोप व्हावा असे विचार लोककल्याण प्रतिष्ठाण चे अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी व्यक्त केले.तुकाई टेकडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात रमजान निमीत्त दावत-ए-इफ्तार चे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यातील २४ वा रोजा ६ वाजून ५२ मिनीटांनी स्वामी समर्थ मंदिरात सोडला. त्यानंतर मुस्लिम बांधवानी स्वामींची आरतीही केली. कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ होले व शादाब मुलानी यांनी केले होते. याप्रसंगी जान मोहम्मद शेख,अझीझ सय्यद,शकील मुल्ला,गुलाब सय्यद,चाँद मुलाणी,सलीम मुलाणी,मुस्तफा शेख,आदील शेख,आसिफ शेख,राजाराम गायकवाड संतोष घाडगे,विलास माने,धिरज गायकवाड आदिंसह बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रविण होले,अविनाश गोडसे,भुषण चव्हाण,प्रसाद होले,आनंद पाचांगणे,रुद्र घाडगे,वेदांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.