प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत रक्षाबंधन; जगदीश मुळीक फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

Rokhthok Maharashtra 2 0

 बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा धागा अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन सण यंदा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत साजरा करण्यात आला आहे. जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथे या रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवाच्या आनंदात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने रुग्णांसोबत काही आनंदाचे क्षण घालवत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधणे आणि त्यांच्याप्रती स्नेह व माणुसकीची भावना व्यक्त करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जात असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रुग्णांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार जगदीश मुळीक,पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, नगरसेवक तथा पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, उद्योजक सुधीर मेहता, कृष्णकुमार गोयल, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोल्हाड तसेच बांधकाम व्यावसायिक संदीप सातव, नगरसेविका कविता गलांडे,सुभाष चव्हान, रमेश गव्हाणे, प्रताप मोहिते, राहुल जाधव, सुधीर वाघमोडे, महेंद्र गलांडे संतोष राजगुरू, धनंजय जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते .

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.