संसदेचं विशेष अधिवेशन जाहीर! डिलिमिटेशन बिल संसदेत येणार?

Rokhthok Maharashtra 6 0

देशाच्या राजकारणात मोठी घडामोड होताना दिसत आहे
केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं असून, या अधिवेशनात बहुचर्चित डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान लोकसभेचं विशेष अधिवेशन होणार आहे. तर राज्यसभेचं अधिवेशन २ आणि ३ डिसेंबरला पार पडणार आहे.
या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही कंबर कसली असून, आज दुपारी साडेचार वाजता काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याचं सांगितलं जात आहे. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी प्रत्येक राज्यातील जागा ५० टक्क्यांनी वाढवल्यास विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करू, अशी भूमिका मांडली आहे.
दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर खासदारही या विधेयकाच्या बाजूने जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाणार का आणि त्यावर विरोधकांची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.