भारतीय डाक विभागात GDS पदांची मेगाभरती; दहावी पास उमेदवारांना मोठी संधी!

Rokhthok Maharashtra 6 0

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.भारतीय डाक विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक अर्थात GDS पदांची मेगाभरती सुरू होणार असून, या भरतीची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे.या भरतीमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर अर्थात BPM, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर अर्थात ABPM आणि डाक सेवक यांसह विविध पदांचा समावेश असणार आहे.

विशेष म्हणजे, या पदांसाठी दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यासोबतच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालविण्याचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे.या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांपर्यंत असणार आहे. शासनाच्या नियमानुसार पात्र आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.या भरतीची संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.उमेदवारांना Online One-Time Registration अर्थात एक-वेळ नोंदणी 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत करता येणार आहे.त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबरपासून सुरू होऊन 21 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.तसेच अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी म्हणजेच Edit करण्याची सुविधा 23 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत उपलब्ध असणार आहे.

त्यामुळे दहावी उत्तीर्ण असलेल्या आणि डाक विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या गरजू उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भारतीय डाक विभागाची अधिकृत जाहिरात, पदांची संख्या, पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर अटी व शर्ती काळजीपूर्वक तपासाव्यात आणि त्यानंतरच अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.दहावी पास… संगणकाचे ज्ञान… सायकल चालविण्याचे ज्ञान… आणि वय 18 ते 40!भारतीय डाक विभागातील GDS भरतीच्या माध्यमातून नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही निश्चितच महत्त्वाची संधी आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.