पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात पक्षपात, महाविकास आघाडी आक्रमक

Rokhthok Maharashtra 23 0

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात व कामे मंजूर करण्यात पक्षपातीपणा होत असल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात व कामे मंजूर करण्यात पक्षपातीपणा करतो महाविकास आघाडीच्या एकाही आमदाराला एका रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही. याउलट महाविकास आघाडीच्या आमदारांवर मात्र निधीचा पाऊस पाडण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदार संघातील जनता ही सरकारला महत्त्वाची वाटत नाही का ? हा प्रश्न विचारतो महाविकास आघाडीच्या वतीने पक्षपातीपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात खासदार सौ. सुप्रियाताई सुळे , प्रशांत जगताप,आमदार अशोकबापू पवार, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. जगन्नाथबापू शेवाळे , भारतीताई शेवाळे, स्वातीताई पोकळे, मृणालताई वाणी, स्वातीताई ढमाले , महादेव कोंढरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.