पुणे

“पुण्यात शॉपिंग करताय मग सावधान व्हा! दिग्गज ब्रँडच्या नावाखाली होतेय बनावट कपड्यांची विक्री, हडपसर पोलिसांची छापेमारी… गुन्हा दाखल..

पुणे (प्रतिनिधी)

पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांची बनावट कपड्यांची विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. ब्रँडेड कंपन्यांचे बनावट शर्ट विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापेमारी केली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. विविध ब्रँडच्या नावाखाली 510 शर्ट पोलिसांनी जप्त केले आहेत. पुण्यातील हडपसर भागात 4 लाख 8 हजार रुपयांचे शर्ट पोलिसांनी जप्त केले आहेत. याबाबत मंगेश जगन्नाथ देशमुख यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रितम सुदाम गावडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश देशमुख हे युएसपीए ग्लोबल लायसेनिंग या कंपनीचे इन्वेस्टिगेशन अधिकारी आहेत. यूएस पोलो असन ही जागतिक पातळीवरची नामांकित शर्ट बनवणारी कंपनी आहे. देशातील अनेक शहरात त्यांचे मोठे मोठे स्टोअर आहेत. तसेच अनेक शॉपिंग मॉलमध्ये त्यांचे शर्ट विक्रीसाठी उपलब्ध असतात. अशातच यूएस पोलो असन ट्रेडमार्क कंपनीच्या बनावट शर्टची हडपसर भागातील महादेवनगरामध्ये असलेल्या रॉयल मेन्स कलेक्शन येथे विक्री केली जात असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. यानुसार त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

तक्रारीवरून पोलिसांनी या दुकानावर छापा टाकला. या छापेमारी मध्ये पोलिसांना यूएस पोलो असन या कंपनीचे नाव वापरून दुसऱ्याच कंपनीचे शर्ट विकत असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या छापेमारीत 4 लाख 8 हजार रुपयांचे 510 शर्ट जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी ते सर्व जप्त करुन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश देशमुख हे युएसपीए ग्लोबल लायसेनिंग या कंपनीचे इन्वेस्टिगेशन अधिकारी आहेत. यूएस पोलो असन ट्रेडमार्क कंपनीच्या बनावट शर्टची हडपसर येथील महादेवनगरातील रॉयल मेन्स कलेक्शन येथे विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. रॉयल मेन्स कलेक्शन या दुकानावर छापा घातला. त्यात 4 लाख 8 हजार रुपयांचे 510 शर्ट बनावट असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ते सर्व जप्त करुन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.