मांजरी बुद्रुक परिसरात रेल्वे उड्डाणपुलापासून ते मुळा–मुठा नदीपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून पथदिवे बंद किंवा नसल्याने अपघात, वाहनांचे नुकसान आणि काही ठिकाणी जीवितहानीही झाली होती.
गेल्या दोन–तीन वर्षांपासून या प्रश्नाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सातत्याने प्रशासनाकडे निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला.
निषेध म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना कंदील भेट देत आंदोलनही करण्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये विद्युत खांब पडूनही अनेक महिने काम सुरू झाले नव्हते.
अखेर स्थानिक शिवसैनिक व ग्रामस्थांनी पडलेल्या खांबावर हळद–कुंकू, नारळ अर्पण करून प्रशासनाला ‘सुबुद्धी’ यावी यासाठी प्रतीकात्मक आंदोलन केलं.
या मुद्द्यावर रोखठोक महाराष्ट्र न्यूज ने बातमी प्रसिद्ध करून पुणे महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं. दखल घेतल्यानंतर आज प्रत्यक्षात खड्डे घेऊन पथदिवे बसवण्याचं काम सुरू झालं आहे.
परिसरात प्रकाश पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे.
जनतेचा आवाज + माध्यमांची दखल = बदल शक्य आहे!
अशाच प्रश्नांसाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत.
