लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक! शरीरसुखाची मागणी प्रकरण उघड

Rokhthok Maharashtra 20 0

जळगावमध्ये शासकीय योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी करून देण्याच्या बहाण्याने आरोपी गोकुळ चव्हाण महिलांकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याचा आरोप आहे.

हतबल महिलांच्या घरी जाऊन त्यांच्यावर दबाव टाकत अश्लील मागण्या केल्या जात असल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. एका महिलेने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
जळगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना आवाहन केलं आहे की, ई-केवायसीसाठी कोणत्याही मध्यस्थावर विश्वास ठेवू नका. ही प्रक्रिया स्वतः मोबाईलवर किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने करा.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.