Asha Bhosle Life Story: 16 व्या वर्षी घेतलेला निर्णय ठरला आयुष्यातील मोठा वळण!

Rokhthok Maharashtra 17 0

भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले या त्यांच्या सुरांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करत होत्या

पण त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अनेकांना माहित नाही…

अवघ्या 16 व्या वर्षी आशा ताईंनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन गणपत राव भोसले यांच्याशी लग्न केलं. या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबाशी, विशेषतः लता मंगेशकर यांच्यासोबतचे संबंध ताणले गेले.

 

लग्नानंतर त्यांचं वैवाहिक आयुष्य अपेक्षेप्रमाणे सुखी राहिलं नाही. आर्थिक अडचणी, कौटुंबिक तणाव आणि जबाबदाऱ्या यामध्ये त्या अडकल्या.

मात्र, या सर्व संकटांवर मात करत त्यांनी हार मानली नाही. मुलांचं संगोपन करत त्यांनी आपल्या गायन करिअरला नव्याने सुरुवात केली… आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आजही अनेकांना प्रेरणा देतो.

आशा भोसले या नावाचा अर्थच असा —संघर्षातून उभं राहिलेलं यश आणि प्रेरणा.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.