भांड्यांच्या बदल्यात जुना मोबाईल देणं आता धोकादायक ठरू शकतं. उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांच्या कारवाईत ‘मदरबोर्ड स्कॅम’ उघड झाला आहे.
कटिहारचा मोबाईल दुकानदार इस्तार आलम हा आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी जोडलेला असल्याचं समोर आलं. तो जुने फोन जमा करून त्यातील मदरबोर्ड काढून चीन आणि बांग्लादेशमधील गुन्हेगारांना पाठवत होता.
हे गुन्हेगार त्या मदरबोर्डमधून डिलीट केलेला डेटा देखील परत मिळवून बँक खात्यांवर हल्ले करत होते.
ही टोळी फेरीवाल्यांच्या माध्यमातून घराघरातून जुने फोन गोळा करत होती, विशेषतः भांड्यांच्या बदल्यात.
पोलिसांनी हजारो मोबाईल जप्त केले असून कोट्यवधींचा व्यवहार उघड झाला आहे.
म्हणून सावधान! जुना फोन देण्याआधी त्याचा मदरबोर्ड पूर्णपणे नष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे.
