2026: मतदार यादीत मोठे बदल! नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

Rokhthok Maharashtra 16 0

हडपसर-मांजरी परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना!
महाराष्ट्रात मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 लवकरच सुरू होणार आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. चुकीची माहिती आणि अस्पष्ट फोटो दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
विशेष लक्ष द्या — ज्या मतदारांचे नाव 2002 च्या यादीत नाही, त्यांनी आपल्या आई-वडिलांची नावे शोधून आवश्यक माहिती तयार ठेवावी.

या प्रक्रियेत संपूर्ण मतदार यादी नव्याने तयार होणार असून प्रत्येक मतदाराकडून फॉर्म भरून घेतला जाणार आहे.
रवींद्र खंदारे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, आवश्यक कागदपत्रे आणि फोटो तयार ठेवून BLO ला सहकार्य करा.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.