पुणे

पुण्यात टँकरचालकांचा संप इशारा! पोलिसांची कडक कारवाई vs पाणीपुरवठा संकट

पुण्यात टँकरचालकांविरोधात कारवाई आणि त्यावरून निर्माण झालेला वाद चिघळण्याची शक्यता आहे.
Mohammedwadi, Undri आणि IBM area परिसरात टँकरच्या अपघातात नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.
टँकरचालकांकडून आता फिटनेस सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, तसेच ब्रेथ अॅनालायझरद्वारे मद्यपान तपासणी केली जात आहे. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे.
वाहतूक विभागाचे उपायुक्त Himmat Jadhav यांनी स्पष्ट सांगितले आहे की, “नागरिकांच्या जीवाला प्राधान्य देत आम्ही ही कारवाई करत आहोत.”

मात्र, या कारवाईमुळे टँकरचालक आणि मालकांमध्ये संताप वाढला आहे. “पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असूनही पोलिसांकडून अडवणूक केली जाते,” असा आरोप करत सुमारे ३०० टँकरमालकांनी १५ तारखेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
आता या वादावर तोडगा निघणार का, की पुण्यात पाणीटंचाई वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.