सांगलीच्या विटात धक्कादायक घटना!

Rokhthok Maharashtra 13 0

“सांगली जिल्ह्यातील विटा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे…”

नेवरी रोड परिसरात 20 वर्षीय श्रद्धा लोटके हिचा मृतदेह घरात आढळून आला. या प्रकरणात पती अविनाश लोटके याच्यावर गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. त्यातूनच मध्यरात्री ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

घटनेनंतर आरोपीने तीन वर्षांच्या मुलाला ओळखीच्या व्यक्तीकडे सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळी नातेवाईकांना संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांना तत्काळ कळवण्यात आले.

👉 “सध्या आरोपी फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. पुढील तपास सुरू आहे.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.