सोलापुरात पतीचा संताप! पत्नीवर हल्ला

Rokhthok Maharashtra 1 0

सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे…”

लोकमान्य नगर परिसरात पतीने पत्नीवर ज्वलनशील पदार्थ टाकून गंभीर इजा केल्याचा प्रकार घडला आहे. नर्गिस शेख असं जखमी महिलेचं नाव असून तिच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणातील आरोपी फैजान जावेद शेख हा बुधवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास पत्नीशी बोलण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. त्याने नर्गिसला आतल्या खोलीत नेलं… जिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

या वादानंतर संतप्त आरोपीने पत्नीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला इजा पोहोचवली आणि घटनास्थळावरून फरार झाला.

घरातून धूर आणि गोंधळ दिसताच शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. नर्गिसला वाचवत तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

माहितीनुसार, 2024 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. मात्र काही महिन्यांतच वाद वाढल्याने ते वेगळे राहत होते आणि घटस्फोटाच्या कारणावरून तणाव सुरू होता.

👉 “या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.