फक्त श्वासाने तपासा Blood Sugar!

Rokhthok Maharashtra 12 0

मधुमेही रुग्णांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
आता रक्त तपासणीसाठी सुई टोचण्याची गरजच उरणार नाही!

नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी एक अत्याधुनिक उपकरण विकसित केले आहे,
ज्याद्वारे केवळ श्वासाच्या आधारे रक्तातील साखरेची पातळी तपासता येणार आहे.

हे ‘नॉन-इनवेसिव्ह’ उपकरण श्वासातील घटकांचे विश्लेषण करून
अचूक साखरेचे प्रमाण सांगते. विशेष म्हणजे, या संशोधनाला
यूके डिझाईनचे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रही मिळाले आहे.

यामुळे मधुमेह तपासणी अधिक सोपी, स्वस्त आणि वेदनामुक्त होणार आहे.
लाखो रुग्णांना दररोजच्या सुईच्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या या उपकरणावर अंतिम चाचण्या सुरू असून,
लवकरच ते बाजारात येण्याची शक्यता आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.