“६० लाख देऊनही घर गमावलं! पुण्यात बिल्डरची धक्कादायक फसवणूक |”

Rokhthok Maharashtra 13 0

“६० लाख रुपये भरले… फ्लॅटचा ताबा घेतला…
आणि एक दिवस दारावर लागली ‘जप्तीची नोटीस’!
पुण्यातील कोंढव्यात घडलेली ही घटना ऐकून तुम्हीही हादराल…”

“कोंढव्यातील निर्माण इस्ट्रेला प्रोजेक्टमध्ये
एका ४५ वर्षांच्या महिलेने ८३२ स्क्वेअर फुटाचा फ्लॅट घेतला…
वेळोवेळी तब्बल ६० लाख रुपये बिल्डर निलेश कामठे याला दिले…
२०२३ मध्ये फ्लॅटचा ताबा मिळाला…
महिला दोन मुलांसोबत तिथे राहायलाही गेल्या…
मेंटेनन्स, लाईट बिल सगळं त्या भरत होत्या…”

“पण काही दिवसातच अचानक आयसीआयसीआय बँकेचे कर्मचारी दारात!
‘हा फ्लॅट बँकेकडे तारण आहे… कर्ज थकलंय… फ्लॅट खाली करा!’
आणि त्यानंतर दुसरा धक्का…
धर्मपेठ बँकेचीही नोटीस!
म्हणजे एकाच फ्लॅटवर दोन बँकांचे कर्ज!”

“तपासात समोर आलं —
बिल्डरने तोच फ्लॅट दुसऱ्याला विकला…
आणि त्यावरून बँकांकडून कर्जही उचललं!
महिला एकटी राहत असल्याचा गैरफायदा घेत
पूर्ण प्लॅनिंग करून ही फसवणूक करण्यात आली…”

“या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
निलेश कामठे आणि इतरांवर कारवाई सुरू आहे.
प्रश्न मात्र मोठा आहे —
पैसे देऊनही घर सुरक्षित नाही?
आणि बिल्डरवर विश्वास ठेवायचा तरी कसा?”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.