पुणे विमानतळावर मोठा अपघात टळला!

Rokhthok Maharashtra 15 0

पुणे विमानतळावर काल रात्री एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली!
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचं लँडिंग करताना लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला… आणि विमानाने हार्ड लँडिंग केलं.

ही घटना रात्री सुमारे 10:25 वाजता घडली.
सुदैवाने वैमानिक पूर्णपणे सुरक्षित आहेत… आणि कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही.

मात्र, या घटनेमुळे विमानतळाची एकमेव धावपट्टी तात्पुरती बंद करावी लागली.
त्यामुळे अनेक नागरी उड्डाणे रद्द झाली किंवा सुरत आणि गोवा येथील विमानतळांकडे वळवण्यात आली.

https://youtube.com/shorts/CSH8ZGjnIXg

 

प्रवाशांना मोठा फटका बसला… अनेक तासांचा खोळंबा झाला.

हवाई दल आणि विमानतळ प्रशासनाकडून धावपट्टी पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
सुमारे ४ ते ५ तासांत सेवा पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं आहे.

पुणे विमानतळावरील ही घटना… सुदैवाने मोठा अपघात टळला, पण काही काळासाठी विमानसेवा विस्कळीत झाली!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.