पुणे… शिक्षणाचं, संस्कृतीचं शहर…
पण आज पुन्हा एकदा गुन्ह्याने हादरलेलं शहर!चंदननगरमध्ये घडलेली ही घटना…
ऐकून अंगावर काटा येईल अशी आहे!
३९ वर्षीय पूनम मून…एक सामान्य महिला…पण तिचा शेवट झाला तो अत्यंत क्रूर पद्धतीने!
आरोप कोणावर?
तर भाजपच्या कायदे विभागाच्या अध्यक्षावर – ॲड. संजय सावंत!
काय आहे प्रकरण?
पोलिसांच्या माहितीनुसार…पूनम मून आणि संजय सावंत यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशयसावंत यांच्या कुटुंबाला होता…
आणि हाच संशय ठरला जीवघेणा!संजय सावंत…त्यांची पत्नी स्वाती…आणि स्वतःची मुलगी…तिघांनी मिळून रचला हत्येचा कट!
चंदननगरमधील ऑफिसमध्ये…पूनम यांना बोलावण्यात आलं…आणि तिथे…त्यांचे पाय दोरीने बांधून…बॅट आणि धारदार शस्त्रांनी निर्घृण हल्ला!इतकंच नाही…हा सगळा प्रकार इतका थरारक होता की…
मानवतेलाही लाजवेल!घटना उघडकीस कशी आली?पूनम यांच्या पतीने…त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार केली…आणि पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला…अवघ्या ६ तासांत पोलिसांनीतीघांनाही बेड्या ठोकल्या!आता प्रश्न उभा राहतो…
👉 प्रेम, संशय आणि अहंकार…
👉 यासाठी कोणाचा जीव घेण्याचा अधिकार कुणाला दिला?
दरम्यान, पूनम मून यांच्या नातेवाईकांनी
चंदननगर पोलीस स्टेशनसमोर आक्रमक भूमिका घेतली आहे…
“न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही!”
असा त्यांचा ठाम इशारा आहे पुण्यातील ही घटना…फक्त एक क्राईम नाही…तर समाजासाठी एक मोठा इशारा आहे!रिलेशनशिपमधील संशय…
किती भयंकर रूप घेऊ शकतो…
याचं हे जिवंत उदाहरण!
