अमरावतीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार | भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर हल्ला

Rokhthok Maharashtra 16 0

महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. अमरावती जिल्ह्यात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. मदत करण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला दुचाकीवर बसवले आणि निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नाही, तर तिच्याकडील पैसेही हिसकावून घेतले.
या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातही अशीच संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर ती मानसिक धक्क्यातून आत्महत्येचा प्रयत्न करते. सुदैवाने तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
दोन्ही घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.