13 महिन्याच्या आराध्याचा दुर्दैवी मृत्यू, गेट कोसळून घडली घटना

Rokhthok Maharashtra 11 0

नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना… अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू…
गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे…
आराध्या मामुलकर आईसोबत इमारतीत येत असताना अचानक लोखंडी गेट निखळून तिच्या अंगावर कोसळलं…
गेट थेट डोक्यावर आदळल्याने ती गंभीर जखमी झाली…

कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेलं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला…
अचानक गेट कसा कोसळला? बसवताना काही त्रुटी होत्या का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत…
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे…
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.