बीड जिल्ह्यातून दोन धक्कादायक घटना समोर आल्या असून परिसरात खळबळ उडाली आहे…
पहिल्या प्रकरणात, अंबाजोगाई येथील २८ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दोन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप आहे.
आरोपी सलमान पठाण याने पीडितेला लग्नाचे स्वप्न दाखवत संबंध प्रस्थापित केले… मात्र जेव्हा विवाहाचा विषय आला, तेव्हा धर्मांतराची अट घालत धमक्या दिल्या.
या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद झाला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत…
दरम्यान, दुसऱ्या घटनेत तक्रार मागे घेण्यासाठी एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला…
या प्रकरणात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे…
बीडमधील या वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे…
