पुणेकरांनो सावधान!
मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी पडताय का?
पुण्यातील Valentina Industries Limited आणि संबंधित एलएलपी कंपनीविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई सुरू केली आहे.
👉 गुंतवणूकदारांना १% कागदोपत्री आणि प्रत्यक्षात ५% परताव्याचे आमिष…
👉 खोट्या आश्वासनांनी कोट्यवधींची गुंतवणूक उभी…
👉 आणि आता थेट गुन्हा दाखल!
हा गुन्हा Banning of Unregulated Deposit Schemes Act 2019 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
👉 तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत…
👉 अनियमित ठेवी स्वीकारल्या…
👉 आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केली!
पुणे पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.
संचालकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
👉 महत्वाचं म्हणजे —
ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी त्वरित कागदपत्रांसह पुढे यावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
📢 दुसरीकडे, ही बातमी समोर आल्यानंतर काही लोकांनी “फेक न्यूज” म्हणत टीका केली…
पण आम्ही स्पष्ट सांगतो —
रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल फक्त अधिकृत पोलीस प्रेसनोटवर आधारितच बातमी दाखवतं!
⚠️ गुंतवणूकदारांसाठी इशारा:
SEBI ची परवानगी नसलेली कोणतीही स्कीम…
जास्त परताव्याचं आमिष…
हे थेट फसवणुकीचं संकेत असू शकतात!
👉 प्रश्न एकच —
जलद पैसा कमावण्याच्या नादात…
आपण स्वतःच फसवणुकीच्या जाळ्यात अडकतोय का?
