कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय?
पोलिसांचा धाक संपलाय का… की अवैध धंदेवाल्यांनी शहर ताब्यात घेतलंय?
धक्कादायक प्रकार समोर आला आहे —
Dwarka Circle Nashik परिसरात प्रवाशांना जुगाराच्या नावाखाली सर्रास लुटलं जातंय!
👉 सकाळी ४ ते १०… आणि संध्याकाळी ६ ते १०…
👉 १० ते १५ जणांची टोळी प्रवाशांना पैशांच्या आमिषाने जाळ्यात ओढते…
चहा-नाश्त्याच्या स्टॉलवर टेबल मांडलं जातं…
“जुगाड-तीन पत्ती”चा खेळ दाखवला जातो…
सुरुवातीला स्वतःच जिंकून दाखवतात… आणि मग प्रवासी अडकतो!
👉 काही मिनिटांत हजारो-लाखो रुपये गायब…
👉 मोबाईलसुद्धा हिसकावला जातो!
विरोध केल्यास मारहाण… दमदाटी…
आणि प्रवासी? पुढच्या प्रवासाच्या घाईत तक्रारही करू शकत नाही!
👉 हा सगळा प्रकार Bhadra Kali Police Station Nashik हद्दीत सुरू असल्याचा गंभीर आरोप…
मग प्रश्न एकच — पोलिस नेमकं करतायत तरी काय?
वारंवार तक्रारी… दाखवायच्या कारवाया…
पण हा काळा धंदा मात्र सुरूच!
⚠️ आता नाशिककरांचा संताप उफाळलाय —
हायवेवर अशी उघड लूट चालणार असेल… तर कायद्याचा धाक उरलाय का?
👉 नागरिकांची मागणी ठाम —
या टोळीचा तात्काळ पर्दाफाश करा!
आणि हा जुगाराचा अड्डा कायमचा बंद करा!
