महिला क्रिकेटर अटकेत! 63 लाखांच्या सेक्सटॉर्शन प्रकरणाने खळबळ

Rokhthok Maharashtra 16 0

“भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ!
मुंबई पोलिसांनी एका महिला क्रिकेटरला अटक केली आहे.

फारखांदा खान असं आरोपीचं नाव असून, ती जम्मू-काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे.
सेक्सटॉर्शन प्रकरणात तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आरोपानुसार, तिने एका उद्योजकाला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून तब्बल 63 लाख रुपये उकळले.

खासगी चॅट सार्वजनिक करण्याची धमकी देत पैसे मागितल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणात तिचा भाऊ आणि आणखी एक साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.
दिल्ली आणि श्रीनगरमधून ही कारवाई करण्यात आली.

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
या घटनेमुळे क्रीडा विश्वात मोठी चर्चा रंगली आहे.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.