पुणे रेल्वे स्टेशनवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पाहणी करताना विकासाच्या दाव्यांमागचं वास्तव समोर आणलं आहे.
स्टेशनवर अनेक गंभीर त्रुटी असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्लॅटफॉर्म तिकीट न घेता अनेकजण मुक्तपणे फिरताना दिसत आहेत… सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे… तसेच व्यसनाधीन व्यक्तींची वर्दळ वाढल्याचंही त्यांनी निदर्शनास आणलं.
स्टेशन परिसरात चोरी, अत्याचार आणि इतर घटनाही घडत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
“येथे तपासणी यंत्रणा प्रभावी नाही, आणि अधिकाऱ्यांची हलगर्जीपणा दिसून येतो,” असंही त्या म्हणाल्या.
या सर्व त्रुटींवर लवकरच डीआरएम आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे सविस्तर अहवाल देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पुणे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा आणि व्यवस्थापनाबाबत आता मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
