पुणे

महाराष्ट्र दिनी धक्कादायक घटना! महिला कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल

महाराष्ट्र दिनी धाराशिवमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान धक्कादायक घटना घडली…
भूविकास बँकेच्या एका महिला कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलत स्वतःवर पेट्रोल ओतून घेतलं…
सेवेत कायम करण्यासाठी आणि थकीत वेतनासाठी त्या गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत होत्या…
मात्र न्याय न मिळाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे…
घटनेनंतर कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला…

पोलीस आणि उपस्थितांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना रुग्णालयात दाखल केलं…
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे…
या प्रकरणी नातेवाईकांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे…
ही घटना प्रशासन आणि व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करते…