पुणे

रिक्षा चालकांवर मराठी सक्ती! राज ठाकरे आक्रमक

“मोठी बातमी! महाराष्ट्रात रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्हं दिसतायत.
पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात झालेल्या व्याख्यानात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

‘आम्ही मराठी बोलणार नाही’ असं म्हणण्याची हिंमत कशी होते? असा सवाल करत त्यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांना फटकारलं.
फक्त इतकंच नाही, तर नियम न पाळणाऱ्यांच्या लायसन्स रद्द करण्याचीही मोठी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, सरकारने 15 ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असला, तरी मराठी शिकवण्याचा कार्यक्रम सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे यांनी जातीय राजकारणावरही टीका करत, ‘आपणच आपल्या महापुरुषांना जातींमध्ये विभागलंय,’ असं म्हणत समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं.

हा मुद्दा आता पुन्हा तापणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे!”