पुणे

भोसरीत ४ अल्पवयीन मुलींशी गैरवर्तनाचा प्रयत्न; सुरक्षारक्षक अटकेत

पुण्यातील भोसरी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.
एमआयडीसी परिसरातील एका गृहनिर्माण प्रकल्पात कामाच्या पहिल्याच दिवशी सुरक्षारक्षक दिनेश चौधरी याने ४ अल्पवयीन मुलींना “पाण्याची टाकी दाखवतो” असे सांगून सातव्या मजल्यावर नेले.

तिथे आरोपीने मुलींशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि “ही गोष्ट कुणाला सांगितली तर मारून टाकेन” अशी धमकी दिली.

 

मात्र, १० वर्षांच्या एका मुलीने घरी जाऊन आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

भोसरी पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.