लाईमलाइटपासून दूर राहणारी संगीता सोरनलिंगम नेमकी कोण?

Rokhthok Maharashtra 13 0

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय सध्या फक्त चित्रपटांमुळेच नाही, तर राजकारणामुळेही जोरदार चर्चेत आहेत. पण आता त्यांच्या पत्नी संगीता सोरनलिंगम यांच्याबद्दलही लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
संगीता यांचा जन्म २२ जून १९७४ रोजी झाला. त्या यूकेमध्ये वाढल्या असून त्यांच्या कुटुंबाची मुळे श्रीलंकेतील तमिळ समाजाशी जोडलेली आहेत. त्यांचे वडील प्रसिद्ध तमिळ उद्योगपती होते.
थलपती विजय आणि संगीता यांनी २५ ऑगस्ट १९९९ रोजी लग्न केलं. त्यांना जेसन संजय आणि दिव्या साशा अशी दोन मुलं आहेत.

विजय यांच्या स्टारडम असूनही संगीता नेहमी लाईमलाइटपासून दूर राहिल्या. त्या फार कमी वेळा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसतात.
मात्र, रिपोर्ट्सनुसार त्यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून अनेकांना धक्का बसतो. संगीता सोरनलिंगम यांची एकूण संपत्ती तब्बल ४०० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.