पुण्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. सॅलिसबरी पार्क परिसरातील ६१ वर्षीय प्रसिद्ध उद्योगपती मृतावस्थेत आढळल्याने व्यावसायिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शनिवारी दुपारी डेक्कनमधील आपटे रोडवरील एका हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह सापडला. संबंधित उद्योगपती शुक्रवारपासून बेपत्ता होते आणि कुटुंबीयांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली होती.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता उद्योगपती मृतावस्थेत आढळले. खोलीत विविध ठिकाणी उलटी झाल्याचे दिसून आले असून, प्राथमिक तपासात विष प्राशन करून आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठीही सापडली असून त्यात आर्थिक अडचणींचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या डेक्कन जिमखाना पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रसिद्ध उद्योगपतीचा हॉटेलमध्ये मृतदेह! विष प्राशन करून आत्महत्येचा संशय
