राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे! राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ईडीकडून समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी एसआयटीने तब्बल साडेपाच तास चौकशी केल्यानंतर आता ईडीची एन्ट्री झाल्याने चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पदाचा गैरवापर करून आर्थिक व्यवहार झाले का? तसेच शिवनिका संस्थेतील सहभाग आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.दरम्यान, अशोक खरातवर ७० कोटींपेक्षा अधिक रक्कम बेनामी खात्यांमधून वळवल्याचा आरोप असून, या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रुपाली चाकणकरांना ED समन्स? चौकशीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ!
