पुण्यात पेट्रोल पंपांवर तुटवडा! काही पंप सायंकाळपूर्वीच बंद, वाहनचालक त्रस्त

Rokhthok Maharashtra 12 0

पुण्यात इंधन तुटवड्याचे संकट गडद होताना दिसत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणाम आता शहरातील पेट्रोल पंपांवर स्पष्टपणे दिसत आहे.
अनेक पेट्रोल पंपांना दिवसाला फक्त एकाच टँकरद्वारे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत असल्याने साठा मर्यादित राहत आहे. त्यामुळे अनेक पंप सायंकाळपूर्वीच बंद होत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

https://studio.youtube.com/video/QuxxRHJbq9s/edit
काही ठिकाणी वाहनचालकांच्या लांबच लांब रांगाही लागल्या असून नागरिकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर फिरावे लागत आहे. त्यातच तेल कंपन्यांकडून पंपचालकांना फक्त एका दिवसाचेच क्रेडिट दिले जात असल्याने आर्थिक ताण वाढत असल्याचेही सांगितले जात आहे.
पंपचालकांच्या मते, परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी अद्याप पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे प्रशासन आणि तेल कंपन्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.