पुण्यातील ब्युटी पार्लरवालीच NEET रॅकेटची लिंक? CBI तपासात मोठा खुलासा

Rokhthok Maharashtra 13 0

पुण्यातील NEET पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे.
ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे या महिलेला पुणे पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा विद्यार्थ्यांना गाठून त्यांना मुख्य एजंट धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होती. पोलिसांनी तिच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला असून, व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स आणि मेसेजेसही तपासात महत्त्वाचे ठरत आहेत.
दरम्यान, राहुरीतील धनंजय लोखंडे हा BAMS डॉक्टर असून मेडिकल ॲडमिशन कन्सल्टिंगच्या नावाखाली मोठं नेटवर्क चालवत असल्याचा संशय आहे.
नाशिकच्या शुभम खैरनारच्या चौकशीनंतर हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं.
आता सीबीआय पश्चिम महाराष्ट्रात आणखी किती एजंट आणि डॉक्टर सहभागी आहेत याचा तपास करत आहे.
या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.