रुपाली चाकणकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नाशिकच्या कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे.
महिला आयोगाच्या पदावरून गच्छंती झाल्यानंतर आधी एसआयटी चौकशी… आणि आता ईडीकडून समन्स… अशातच ईडी चौकशीच्या आदल्या दिवशीच चाकणकर आणि अशोक खरात यांच्या गुवाहाटी दौऱ्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात हे तिघेही गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये एकाच कालावधीत वास्तव्यास होते. या दौऱ्यात कामाख्या देवी दर्शन आणि पूजा अर्चेची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अशोक खरातच्या शिवनिका संस्थानाशी चाकणकर यांचे जवळचे संबंध असल्याचेही समोर आले आहे. मात्र आर्थिक व्यवहारांशी आपला संबंध नसल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे.
आता ईडी आर्थिक अफरातफरीच्या आरोपांवरून चौकशी करणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे चाकणकर यांच्या अडचणी वाढवतोय तरी कोण? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
